कराड (सातारा) - रेल्वे कर्मचारी असलेल्या युवकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ओगलेवाडी-कराड रेल्वे स्टेशनसह परिसरात खळबळ उडाली. प्रशासन तातडीने रेल्वे स्टेशन परिसरात दाखल झाले. प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला असून त्याच्या थेट संपर्कात आलेल्या १० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कराड रेल्वे स्टेशनचा परिसर सील; कोरोनाबाधिताच्या संपर्कातील १० जण क्वारंटाईन - corona latest news
कोरोनाबाधित युवक रेल्वे कर्मचारी असून तो मूळचा बिहारचा आहे. १९ मार्चला पटना (बिहार) येथून तो कराड रेल्वे स्टेशनला आला होता. त्याला ११ एप्रिलला कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी दुपारी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय पवार हे आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत रेल्वे स्टेशन परिसरात दाखल झाले. रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या १० जणांना क्वाॅरंटाईन करण्यात आले. रेल्वे स्टेशन, ओगलेवाडीचा तीन कि. मी. परिसर सील करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने घरोघरी सर्व्हे सुरू केला आहे.