महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराडच्या प्राध्यापकांनी लावला गवत कुळातील नव्या प्रजातीचा शोध - Yashwantrao Chavan

संशोधनामध्ये शोध लावण्यात आलेल्या या नवीन वनस्पतीचे 'मकॅपिलिपेडीयम यशवंतराव' असे नामकरण केले आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी, सायन्स अँड इंजिनिअरींग रीसर्च बोर्ड, नवी दिल्ली प्रकल्पांतर्गत हे संशोधन करण्यात आले आहे. प्रकल्प प्रमुख आणि सायन्स कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गिरीश पोतदार आणि डीएसटी प्रोजेक्ट फेलो तरबेज शेख यांनी या वनस्पतीचा शोध लावला आहे.

यशवंतराव चव्हाण कॉलेज
यशवंतराव चव्हाण कॉलेज

By

Published : Jun 3, 2021, 4:47 PM IST

Updated : Jun 3, 2021, 5:43 PM IST

कराड (सातारा) - कराडच्या यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधकांनी गवत कुळातील वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. या वनस्पतीला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले आहे.

गवत कुळातील नव्या प्रजातीचा शोध

'मकॅपिलिपेडीयम यशवंतराव' असे नामकरण -

संशोधनामध्ये शोध लावण्यात आलेल्या या नवीन वनस्पतीचे 'मकॅपिलिपेडीयम यशवंतराव' असे नामकरण केले आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी, सायन्स अँड इंजिनिअरींग रीसर्च बोर्ड, नवी दिल्ली प्रकल्पांतर्गत हे संशोधन करण्यात आले आहे. प्रकल्प प्रमुख आणि सायन्स कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गिरीश पोतदार आणि डीएसटी प्रोजेक्ट फेलो तरबेज शेख यांनी या वनस्पतीचा शोध लावला आहे. न्यूझीलंडमधून प्रकाशित होणार्‍या मफायटोटॅक्साफ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये या नवीन वनस्पती प्रजातीचा संशोधन लेख प्रकाशित झाला आहे.

आंतरराष्ट्रीय मान्यता प्रदान -

मध्यप्रदेशातील मैकल डोंगररांगेतील अन्नुपूर जिल्ह्यामधील प्रसिद्ध अमरकंटक येथे या प्रकल्पांतर्गत संशोधन करत असताना ही वनस्पती 2019 मध्ये प्रकल्प प्रमुख डॉ. पोतदार व डीएसटी प्रोजेक्ट फेलो तरबेज शेख या संशोधकांनी शोधली. त्यावर संशोधन केल्यानंतर जगातील कोणत्याही ठिकाणी असे साध्यर्म असलेली वनस्पती अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या वनस्पतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. ही वनस्पती गवत कुळातील असून याचा पुष्पसंभार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान या वनस्पतीला फुले येतात. समुद्रसपाटीपासून 1 हजार मीटर उंचीवर ही वनस्पती वाढते. जागतिक स्तरावर याआधी कॅपिलीपेडीयम या गवताच्या एकूण 18 प्रजातींची नोंद झाली आहे. त्यापैकी 8 प्रजातींची नोंद भारतात झाली आहे.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण मंडळाची विद्यानगर-कराड येथे 1958 ला स्थापना केली. विज्ञानाचे शिक्षण मिळावे म्हणून विद्यानगरमध्ये यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सुरू झाले. दिवंगत पी.डी. पाटील यांनी या संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळली. सध्या सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या संचालकपदाची धुरा सांभाळत आहेत. सायन्स कॉलेजमधील विविध विभागामध्ये संशोधनाचे काम सातत्याने सुरू असते. विज्ञानामध्ये प्रगती व्हावी यासाठी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले आहे. उद्योग, अर्थ, सहकार, साहित्य व कृषी क्षेत्रामधील यशवंतरावांच्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ या नवीन वनस्पतीला मकॅपिलिपेडीयम यशवंतराव असे नाव देऊन त्यांना समर्पित करण्यात आली आहे.

गवत कुळातील नवीन वनस्पतीच्या संशोधनाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक तथा सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांच्यासह संस्थेच्या संचालकांनी डॉ. गिरीश पोतदार आणि तरबेज शेख यांचे अभिनंदन केले आहे.

Last Updated : Jun 3, 2021, 5:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details