कराड (सातारा)- सतत अबालवृद्धांची गजबज असणारा कराडचा प्रीतिसंगम आणि दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचा परिसर लॉकडाऊनमुळे गेली दीड महिना ओस पडला आहे. कराडमधील प्रीतिसंगम बाग, नदीचे वाळवंट आणि कृष्णा-कोयना नदीच्या संगमाचे सुंदर चित्रीकरण खास 'ईटीव्ही भारत'च्या प्रेक्षकांसाठी
कराडचा 'प्रीतिसंगम' पाहा ड्रोन कॅमेऱ्यातून
यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराडमध्ये कृष्णा-कोयना या दोन्ही नद्यांचा संगम झाला आहे. याच परिसरात यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे. याच समाधीस्थळ परिसरात प्रीतिसंगम बाग आहे.
यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराडमध्ये कृष्णा-कोयना या दोन्ही नद्यांचा संगम झाला आहे. याच परिसरात यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे. याच समाधीस्थळ परिसरात प्रीतिसंगम बाग आहे. समाधी परिसरात लहान मुलांसाठी खेळणी आहेत. ज्येष्ठ नागरीक सकाळी बागेत फिरायला यायचे. तसेच हास्य क्लबच्या सदस्याचे विविध उपक्रम सुरू असायचे. योगा करणारेही नित्याने या ठिकाणी येत होते. दरम्यान, लॉकडाऊनमुळे सध्या येथे कोणीही दिसत नाही.
उन्हाळ्यात हा परिसर दिवसभर गजबजलेला असतो. परंतु, लॉकडाऊनमुळे बागेकडे आता कोणीही फिरकत नाही. त्यामुळे सध्या हा परिसर सुनसान आहे. नदीचे वाळवंट, नदीवरील घाट एकांतवास अनुभवतोय. प्रीतिसंगम बागेतील पक्ष्यांचा किलबिलाट ओम पवार आणि मारूती पाटील यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपला आहे.