सातारा- विना मास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारत कराड पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात २८ लाख ३९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकार्यांनी जारी केला आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
विना मास्क फिरणार्या व्यक्तीला ५०० रुपये आणि सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला १ हजार रुपये दंड आकारण्याचे जिल्हाधिकार्यांच्या आदेशात नमूद आहे. आदेशानुसार विना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्या प्रकरणी १ हजार ६६९ जणांवर कारवाई करून ८ लाख २४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात वाहतूक नियमन करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ९ हजार ६३८ वाहनधारकांवर कारवाई करून २० लाख ५१ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यानुसार सप्टेंबर महिन्यात पोलिसांनी एकूण २८ लाख ३९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करत धडाकेबाज कारवाई केली आहे.