कराड (सातारा) - कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम, कराडचा कृष्णा घाट आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांचा समाधी परिसर बुधवारी धुक्यात हरवला. कराडकरांनी या गुलाबी थंडीचा आनंद लुटला. संपूर्ण परिसरावर दाट धुक्याची चादर पहायला मिळाली. या आल्हाददायक वातावरणात नदीपात्रावरून पक्ष्यांचे थवे देखील विहार करताना पहायला मिळाले.
कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम हरवला धुक्यात.. कराडकरांनी लुटला गुलाबी थंडीचा आनंद
कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम, कराडचा कृष्णा घाट आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांचा समाधी परिसर बुधवारी धुक्यात हरवला. कराडकरांनी या गुलाबी थंडीचा आनंद लुटला. संपूर्ण परिसरावर दाट धुक्याची चादर पहायला मिळाली. या आल्हाददायक वातावरणात नदीपात्रावरून पक्ष्यांचे थवे देखील विहार करताना पहायला मिळाले.
कराड कृष्णा-कोयना संगम न्यूज
यंदाच्या हिवाळ्यात आज पहिल्यांदाच कराड परिसरातील तापमानात मोठी घट पहायला मिळाली. पारा घसरल्याने सकाळी दहापर्यंत थंडी जाणवत होती. तसेच सव्वा नऊपर्यंत प्रीतिसंगम परिसरात दाट धुके होते. सकाळी प्रीतिसंगम परिसरात फिरायला येणार्या कराडकरांनी या गुलाबी थंडीचा आनंद लुटला. नदीचे पात्रही काही काळ धुक्यात हरवले होते. साडे नऊनंतर कराडकरांना सूर्यदर्शन झाले.
हेही वाचा -विदर्भात थंडीची तीव्रता घटली; नव्या वर्षात थंडीच्या पुनरागमनाची शक्यता
Last Updated : Dec 30, 2020, 4:25 PM IST