सातारा - रमाई आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल कराड पंचायत समितीला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला आहे. यात कराड पंचायत समितीने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्य सचिव अजोय मेहता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ग्रामीण गृहनिर्माण राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन कराड पंचायत समितीचा गौरव करण्यात आला.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम झाला. कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रमाई आवास योजनेमध्ये प्रथम टप्प्यामध्ये १००३ घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. कराड पंचायत समितीचे रमाई आवास योजनेच्या अंमलबजावणीचे सरासरी प्रमाण ७५.१ टक्के आहे.