कराड (सातारा) - कराडच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: पीपीई कीट घालून शुक्रवारी कोव्हिड रुग्णाचा मृतदेह सील करून रुग्णवाहिकेत ठेवला. तसेच मृतदेह स्मशानभूमीत नेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडले.
कराडच्या मुख्याधिकाऱ्यांनी पीपीई कीट घालून कोविड रुग्णाचा मृतदेह केला सील - कराड मुख्याधिकारी न्यूज
कराडमधील सोमवार पेठेत शुक्रवारी कोरोनाग्रस्त नागरिकाचा राहत्या घरात मृत्यू झाला. नगरपालिका आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी कोरोनाच्या सेवेत व्यस्त होते. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांसमवेत स्वत: पीपीई कीट घालून मुख्याधिकारी रमकांत डाके यांनी कोविड मृताच्या घरात जावून त्याचा मृतदेह सील केला.
कराडमधील सोमवार पेठेत शुक्रवारी कोरोनाग्रस्त नागरिकाचा राहत्या घरात मृत्यू झाला. नगरपालिका आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी कोरोनाच्या सेवेत व्यस्त होते. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांसमवेत स्वत: पीपीई कीट घालून मुख्याधिकारी रमकांत डाके यांनी कोव्हिड मृताच्या घरात जावून त्याचा मृतदेह सील केला. कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कोरोनाग्रस्तांचा मृतदेह घराबाहेर काढून तो शववाहिकेत ठेवला. मृतदेह स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कारही केले. त्यानंतर मुख्याधिकारी डाके हे आपल्या कामावर हजर झाले.
मुख्याधिकारी डाके यांनी दाखवलेल्या धाडसाचे तसेच स्वत: पुढे होऊन पार पाडलेल्या जबाबदारीचे कराडकरांनी कौतुक केले. मुख्याधिकाऱ्यांच्या धाडसामुळे कोव्हिड महामारी काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही मनोधैर्य उंचावले आहे.