महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची मुदतवाढ रद्द; अचानक बदली - satara news

एक वर्ष मुदतवाढ मिळाली असताना ती रद्द करून कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची गुरुवारी अचानक बदली करण्यात आली. या बदलीची राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा आहे.

Karad chief Officer Yashwant Dange abruptly transferred
कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची मुदतवाढ रद्द; अचानक बदली

By

Published : Jul 24, 2020, 8:00 PM IST

कराड (सातारा) - एक वर्ष मुदतवाढ मिळाली असताना ती रद्द करून कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची गुरुवारी अचानक बदली करण्यात आली. या बदलीची राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा आहे. त्यांच्या जागी भुसावळचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना आजच (शुक्रवारी) पदभार घेण्यास सांगण्यात आले आहे.


यशवंत डांगे यांनी सप्टेंबर 2017 मध्ये कराडच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात कराडला स्वच्छ सर्व्हेक्षणात देशपातळीवर लौकिक मिळाला. 2018 मध्ये कराड नगरपालिकेने देशात 38 वा क्रमांक, तर 2019 मध्ये देशात प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले होते. मुख्याधिकारी डांगे यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली होणार, असे मानण्यात येत होते. परंतु, नगर विकास विभागाने त्यांना एक वर्षे मुदतवाढ दिली होती. त्यानंतर काही दिवसातच त्यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली.


यशवंत डांगे यांना मिळालेली मुदतवाढ कायम राहावी, अशी बहुतांश कराडकर यांची इच्छा आणि मागणी होती. परंतु, गुरुवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचा आदेश कराड नगरपालिकेत आला. मुदतवाढ रद्द करून त्यांची बदली झाल्याने कराड नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे. डांगे यांच्या जागी भुसावळ (जि. बुलडाणा) नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डाके यांना शुक्रवारीच पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात डांगे यांचे काम चांगले असून त्यांना देण्यात आलेली मुदतवाढ कायम ठेवावी. त्यांची बदली रद्द करावी, असे मेल कराडमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details