महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुड न्यूज : कराड झाले कोरोनामुक्त; आता लक्ष ग्रामीण भागावर... - कराड झाले कोरोनामुक्त

karad-became-covid-19-free
कराड झाले कोरोनामुक्त

By

Published : May 22, 2020, 8:46 PM IST

कराड (सातारा) - कराड शहर आणि शहर हद्दीतील सात रुग्ण शुक्रवारी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कराड शहर आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून प्रशासनाने आता ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे.

कराड झाले कोरोनामुक्त

सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारी मलकापूर (ता. कराड) येथील 45 वर्षीय महिला, 49 वर्षीय पुरूष, वनवासमाची (ता. कराड) येथील 40 व 60 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 24 वर्षीय आरोग्य कर्मचारी आणि कराडच्या मंगळवार पेठेतील 65 वर्षीय महिला आज कोरोनामुक्त झाली. कराड शहर कोरोनामुक्त झाल्याने प्रशासनावरील ताण थोडा कमी झाला आहे. आता प्रशासनाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details