सातारा - : महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव (ता.वाई) येथील श्री.काळेश्वरी देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. (Yatra of Goddess Kaleshwari canceled) तसचे, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर येथे (Yatra of Goddess Kaleshwari) जमाव बंदी आदेश लागू केली आहे. येथील मांढरदेवी देवस्थान ट्रस्टने मंदिरही भाविकांसाठी बंद केले आहे.
१७ जानेवारी यात्रेचा मुख्यदिवस
शाकंभरी पोर्णिमेला म्हणजे १७ जानेवारी हा मांढरदेव यात्रेचा मुख्य दिवस समजला जातो. यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र राज्यातील लाखो भाविक दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. शाकंभरी पोर्णिमा या दिवशी तसेच प्रत्येक मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारी आणि अमावस्या, पोर्णिमेला अशी यात्रेपूर्वी १५ दिवस आणि यात्रेनंतर १५ दिवस याठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते.