महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांनी कडकनाथ प्रकरणी केली तक्रार दाखल; मंत्री सदाभाऊ खोतांच्या मुलाचे नाव, पोलिसांचा 'यू टर्न' - kadaknath coruption issue satara farmers file a complaint

कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही खोत यांचे आरोपींच्या यादीतून नाव वगळून त्यांना चक्क साक्षीदार करण्यात आले आहे. याप्रकरणी पाटण पोलिसांनी सागर खोत हे नाव नजरचुकीने दाखल झाले असून ते साक्षीदार असल्याचे प्रसिद्धीपत्रक पोलिसांनी जाहीर केले आहे.

सागर खोत

By

Published : Sep 8, 2019, 3:32 AM IST

Updated : Sep 8, 2019, 4:54 AM IST

सातारा -महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायातून लाखो रुपयांचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून इस्लामपूर येथील महारयत ऍग्रो कंपनीने शेकडो शेतकर्‍यांना कोट्यवधींचा गंडा घातलेला आहे. यामध्ये कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोतांसह त्यांच्या मुलाचाही यात समावेश असल्याचे समोर येत आहे. याचप्रकरणी जिल्ह्यातील 72 शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांचे नाव नंतर काढून टाकण्यात आले आहे. याप्रकरणी सहा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - ''कडकनाथ' प्रकरणी सदाभाऊ खोतांचा राजीनामा घ्यावा'

इस्लामपूर येथील महारयत ऍग्रो कंपनीने पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायातून लाखो रुपयांचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या कंपनीत लाखो रुपये गुंतवलेल्या शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील 72 शेतकर्‍यांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर शेतकर्‍यांनी पाटण पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हेही वाचा - ...तर भर चौकात सहकुटुंब फाशी घेऊ - कृषी राज्यमंत्री खोत

याप्रकरणी सचिन शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महारयत ऍग्रोचा संस्थापक सुधीर मोहिते, संदीप मोहिते (इस्लामपूर), गणेश शेवाळे (रा. बहे, वाळवा) याच्यासह वसिम विभुसे, दमामे मॅडम व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मुलगा सागर खोत यांच्याविरोधात पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, संशयीत आरोपी सागर खोत याच्यावर गुन्हा दाखल होऊनही खोत यांचे आरोपींच्या यादीतून नाव वगळून त्यांना चक्क साक्षीदार करण्यात आले आहे. याप्रकरणी पाटण पोलिसांनी सागर खोत हे नाव नजरचुकीने दाखल झाले असून ते साक्षीदार असल्याचे प्रसिद्धीपत्रक पोलिसांनी जाहीर केले आहे. सदाभाऊ खोत हे सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री आहेत. साहजिकच सातारा जिल्हा प्रशासनावर त्यांची मजबूत पकड आहे. कदाचित याच दबावापोटी पोलिसांनी सागर खोत यांचे नाव आरोपींमधून वगळले असावे, असा आरोपही कडकनाथ पीडित शेतकर्‍यांनी केलेला आहे

हेही वाचा - कडकनाथ घोटाळा : जास्त पैसे देण्याचे अमिष दाखवून शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा

कडकनाथ प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कालच याप्रकरणी मुंबई येथील सक्त वसुली अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडे याबाबत तक्रार केलेली आहे. ईडीनेही हे प्रकरण गांभीर्याने घेवून याबाबत कारवाईचे आश्‍वासन दिलेले आहे. मंत्री सदाभाऊ खोत व माजी खासदार राजु शेट्टी यांच्यामध्ये कडकनाथ वरुन वाकयुद्ध रंगले असतानाच काल पाटण पोलीस ठाण्यात सागर खोत याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, एका रात्रीतच पाटण पोलिसांनी युटर्न घेत सागर खोतला आरोपींमधून वगळून चक्क साक्षीदार केल्यामुळे कडकनाथ पीडित शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Last Updated : Sep 8, 2019, 4:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details