सातारा -ऐन गणेशोत्सवादरम्यान माण तालुक्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. तालुक्यातील नरवणे येथे कबड्डी सामन्यासाठी आलेल्या मुंबईच्या खेळाडूचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. गणेशोत्सवानिमित्त ही कबड्डी स्पर्धा भरविण्यात आली होती.
मुंबईच्या खेळाडूचा साताऱ्यातील विहिरीत बुडून मृत्यू - death by drowning in well satara
अविनाश अनंत शिंदे, वय 17 असे या मृत तरुणाचे नाव आहे. अविनाश घाटकोपरमधील इंदिरानगर,साईनाथनगर रोड येथील रहिवासी होता. नरवणे येथे गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा सुरू आहेत. त्यासाठी मुंबईतून संघ आले होते. आज मंगळवारी सकाळी या संघातील काही खेळाडू अंघोळीसाठी खटकाळी शिवारातील कॅनॉलवर गेले होते.
![मुंबईच्या खेळाडूचा साताऱ्यातील विहिरीत बुडून मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4393942-543-4393942-1568103471965.jpg)
अविनाश अनंत शिंदे, वय 17 असे या मृत तरुणाचे नाव आहे. अविनाश घाटकोपरमधील इंदिरानगर,साईनाथनगर रोड येथील रहिवासी होता. नरवणे येथे गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा सुरू आहेत. त्यासाठी मुंबईतून संघ आले होते. आज मंगळवारी सकाळी या संघातील काही खेळाडू अंघोळीसाठी खटकाळी शिवारातील कॅनॉलवर गेले होते.
हेही वाचा -अबब... घरात चोरी करणारा निघाला पत्नीचा फेसबुक फ्रेंड
कॅनॉलमध्ये अंघोळ केल्यानंतर चांगल्या पाण्यात अंघोळ करावी म्हणून शेजारी असलेल्या विहिरीत हे खेळाडू गेले. त्यातील अविनाश हा विहिरीत उतरला. पण त्याला पोहता येत नसल्याने तो बुडाला. तिथे उपस्थित असलेल्या खेळाडूंना पोहता येत नसल्याने त्याला वाचवता आले नाही. थोड्या वेळातच त्या ठिकाणी पोलिस प्रशासन दाखल झाले आणि अविनाश मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह पाठवण्यात आला आहे