महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा रुग्णालयातून मृत महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी; नातेवाईक संतप्त - सातारा जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण न्यूज

एका साठ वर्षीय महिलेला तब्येतीच्या तक्रारीमुळे शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर त्या महिलेचा 'ईसीजी' काढण्यासाठी अन्य कक्षात हलविण्यात आले. त्यावेळी त्यांच्या गळ्यात सोन्याची माळ होती. मात्र, उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयातील सर्व प्रक्रिया करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यावर सोन्याची माळ नव्हती.

सातारा क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालय न्यूज
सातारा क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालय न्यूज

By

Published : Feb 14, 2021, 5:19 PM IST

सातारा - क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालयाअंतर्गत समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिले आहे.

'ईसीजी' काढताना होती चेन

याबाबत अधिक माहिती अशी, एका साठ वर्षीय महिलेला तब्येतीच्या तक्रारीमुळे शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर त्या महिलेचा 'ईसीजी' काढण्यासाठी अन्य कक्षात हलविण्यात आले. त्यावेळी त्यांच्या गळ्यात सोन्याची माळ होती. 'ईसीजी' काढल्यानंतर त्या महिलेची प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला.

'आयसीयू'त सापडले काळे मणी

रूग्णालयातील सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर मृतदेह ताब्यात घेताना त्यांच्या गळ्यात सोन्याची माळ नसल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. रुग्णालयातील कर्मचारी व नातेवाईकांनी सोन्याच्या माळेची शोधाशोध सुरू केल्यानंतर अतिदक्षता विभागात माळेमधील काळे मणी तुटून पडल्याचे समोर आले. त्यामुळे अज्ञात चोरट्याने मृत महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरून नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

चौकशी समिती स्थापन

दरम्यान, या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालयाच्या प्रतिमेला धक्का बसला असून नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. या चोरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details