सातारा- भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे आज पुण्यातील मोदीबाग येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले असल्याची चर्चा मोठी जिल्ह्यात रंगली होती. यावर आमदार गोरे यांनी मी कोणालाही भेटलो नाही. शरद पवार हे मोदी बागेत राहतात मला माहित नव्हते, असे सांगत पवारांची भेट घेतली नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मी शरद पवार यांना भेटलो नाही - आमदार गोरे - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटलो नसल्याचे स्पष्टीकरण आमदार जयकुमार गोरे यांनी दिले.
![मी शरद पवार यांना भेटलो नाही - आमदार गोरे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5086318-thumbnail-3x2-satara.jpg)
आमदार जयकुमार गोरे
आज दुपारी आमदार जयकुमार गोरे शरद पवार यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. यावर आमदार जयकुमार गोरे यांनी मी कोणाला भेटलो नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे भेटीच्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
हेही वाचा - कराडमधील अपघातप्रकरणी ड्रेनेज बांधकाम ठेकेदारावर गुन्हा
Last Updated : Nov 16, 2019, 9:13 PM IST