सातारा - जम्मू-काश्मीरच्या लेह-लडाखमध्ये लष्करी ऑपरेशन ( Military operations ) दरम्यान सातार्यातील खटाव गावचे सुपूत्र सूरज शेळके ( Suraj Shelke ) या जवानाला वीरमरण आले. मागील 30 दिवसात खटाव तालुक्यातील तिसरा जवान शहीद ( Third jawan martyr ) झाल्याने संपुर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
23 व्या वर्षी वीरमरण -जवान सुरज शेळके हे तीनच वर्षांपूर्वी लष्करात भरती ( Indian Army ) झाले होते. त्यांचे लेह-लडाखमधील पहिलेच पोस्टिंग होते. लष्कराच्या ऑपरेशन रक्षक दरम्यान ते शहीद झाले. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी वीरमरण आल्याने संपुर्ण खटाव तालुका शोकसागरात बुडाला आहे. सूरज यांच्या पश्चात आई, वडील आणि छोटा भाऊ आहे.
तीस दिवसांत तिसरा जवान शहीद -मागील 30 दिवसात खटाव तालुक्यातील तीन जवान शहीद झाले ( Three jawans were martyred ) आहेत. दि. 11 जून रोजी खटावमधील भुरकवडी गावचे सुपुत्र संग्राम फडतरे ( Sangram Phadtare ) लेहमध्ये शहीद झाले होते. त्या अगोदर दि. 27 मे रोजी खटामधीलच विसापूर गावचे सुपुत्र सुभेदार विजय सर्जेराव शिंदे ( Vijay Sarjerao Shinde ) यांना देखील वीरमरण आले होते. आता सुरज शेळके शहीद झाल्याने सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा -Amit Shah On Gujrat Riots 2002 : गुजरात दंगल प्रकरणात मोदींवर बेछूट आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी : अमित शाह
हेही वाचा -Maharashtra Political Crisis : राजकीय आकसापोटी काढले शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, 38 आमदारांची ट्विट केली यादी