सातारा - एनपीआर, एनआरसी, सीएए विरोधी कृती समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या आजच्या दहाव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. आंदोलनकर्त्यांनी संकल्प केला की आंदोलन शांतता व अहिंसेच्या मार्गाने करू. हे आंदोलन करताना सामान्य जनतेला कमीत कमी त्रास होईल व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ.
दररोज एका कुटुंबाला विरोधाची कारणे सांगण्याचा एनआरसी विरोधी आंदोलनाचा संकल्प - News about Satara District Collectorate
एनपीआर, एनआरसी, सीएए विरोधी कृती समितीचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी आंदोलन शांततेत व अहिंसेच्या मार्गाने करण्याचा संकल्प केला. या कायद्या बद्दल रोज एका कुटुबांला कायद्या विषयी माहिती देऊन आंदोलननात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा संकल्प केला. या आंदोलनात सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती रोज किमान एका नव्या कुटुंबाला या कायद्यांविषयाची माहिती देईल आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करेल. कोणत्याही परिस्थितीत आम्हीं हिंसेच्या मार्गाचा अवलंब करणार नाही. आम्हीं आमची निदर्शने आणि विरोध करताना शिवराळ वा असभ्य भाषा वापरणार नाही. या कायद्याचा परिणाम करणाऱ्या गरीब व मागास घटकांना सहानुभूतीने, शांतपणे येणाऱ्या अडचणींची व संकटाची माहिती देऊ. असा संकल्प आंदोलनकर्त्यांनी केला. कृती समितीचे मीनाज सय्यद, जमीर शेख, मिलिंद पवार, विजय मांडके यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी आजरा येथील संग्राम सावंत, संजय कुंभार, कोयनानगरचे सरपंच जनार्दन पवार, मुश्रफ आतार, सकिना कुरेशी, आसिया शेख, महेक शेख, सफदर सय्यद यांच्यासह अनेकांची भाषणे झाली.