सातारा - कराडच्या रेठरे बुद्रुक कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाट्याची विविध निकषांनुसार सोमवारी तपासणी करण्यात आली. यामध्ये कारखान्याचा वजनकाटा अचूक असल्याचे आढळून आले.
हेही वाचा - कोरेगाव-भीमा प्रकरण : 'सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा केंद्र सरकारला अधिकार'
जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिले आहेत. त्यांच्या या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. २० किलो क्षमतेच्या वजनाने ही तपासणी करण्यात आली. यावेळी उसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजनही करण्यात आले. गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवण्यात आल्या होत्या. वजनकाट्याबाहेर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेवर भरलेल्या आणि रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे दाखविण्यात येत असल्याचे यावेळी अधिकार्यांच्या निदर्शनास आले. यामुळे कृष्णा कारखान्याचा वजनकाटा निर्दोष आणि अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला.