महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 30, 2020, 10:43 PM IST

ETV Bharat / state

पाचगणी नगर पालिकेच्या माजी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशीचे आदेश

पाचगणी नगर पालिकेच्या माजी मुख्याधिकाऱ्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पालिकेच्या माजी मुख्याधिकारी अमिता दगडे यांच्या विरोधात घरभाडे, विमान प्रवास, हेरिटेज मिळकतीत दिल्या गेलेल्या बांधकाम परवानग्या अशा विविध 36 प्रकरणात चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

pachgani Municipality news
पाचगणी नगर पालिका

सातारा -पाचगणी नगर पालिकेच्या माजी मुख्याधिकाऱ्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पालिकेच्या माजी मुख्याधिकारी अमिता दगडे यांच्या विरोधात घरभाडे, विमान प्रवास, हेरिटेज मिळकतीत दिल्या गेलेल्या बांधकाम परवानग्या अशा विविध 36 प्रकरणात चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

पदावर असताना अमिता दगडे यांनी मुख्याधिकारी निवास्थान मोडकळीला आल्याचे सांगून, घरभाड्यापोटी पालिकेच्या फंडातून दरमहा 35 हजार रुपये घेतले, आणि मुख्याधिकारी निवास्थान एका पतसंस्थेला भाड्याने दिले. तसेच नगर पालिका फंडाच्या पैशातून विमान प्रवास केला. असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी आकाश बाजीराव रांजणे व राजेंद्र गोरखनाथ काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांकडून 36 प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details