सातारा - राज्यातील अनेक भागात अजुनही पावसाची प्रतिक्षा आहे. पेरण्या खोळंबल्या आहेत. अशा परिस्थितीत शेती आणि उद्योग क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राची भाग्यरेखा आणि उद्योग विश्वाचा कणा असणार्या कोयना धरणात प्रतिसेकंद 9 हजार 129 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे. समाधानकारक पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होऊ लागली आहे.
शेती आणि उद्योग क्षेत्रासाठी दिलासादायक बाब - पूर्ण तळाला गेलेल्या कोयना धरणातील पाण्याची साठ्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षाला 1 जूनपासून सुरूवात झाली आहे. मात्र, महिना उलटला तरी जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाला सुरूवात झालेली नाही. पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचे आगमन उशीराच झाले. परिणामी पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला होता. परंतु, आता पावसाने जोर धरला असून धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. शेती आणि उद्योग क्षेत्रासाठी ही मोठी दिलासादायक बाब मानावी लागणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार - कास, बाणमोलीसह महाळेश्वर, नवजा आणि कोयनानगर या धरणाच्या पाणलोट क्षेत्राात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. परिणामी धरणात पाण्याची आवक आता वाढू लागली आहे. प्रतिसेकंद 9 हजार क्युसेक इतकी आवक होऊ लागल्याने धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे.
कोयनेतील पाणीसाठा झाला 12.78 टीएमसी- समाधानकारक पाऊस आणि आवक सुरू झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा 12.76 टीएमसी आणि पाणी पातळी 620 मीटर झाली आहे. गेल्या चोवीस तासात पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 59 मिलीमीटर, नवजा येथे 92 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेस पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग कायम आहे. महाराष्ट्राची भाग्यरेखा आणि उद्योग विश्वाचा कणा असणार्या कोयना धरणात प्रतिसेकंद 9 हजार 129 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली असल्याने आगामी काळातील पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न मिटणार आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होऊ लागली आहे.
हेही वाचा..
- Koyna Dam : कोयना धरणात उरला केवळ ६ टीएमसी पाणीसाठा; वीजनिर्मिती ठप्प होण्याच्या मार्गावर
- Koyna Dam : महाराष्ट्राची चिंता वाढली; कोयना धरणातून विसर्ग बंद, पाणीसाठ्याची निच्चांकी पातळीकडे वाटचाल
- ahabaleshwar Rain : महाबळेश्वरात मुसळधार पाऊस; कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला