सातारा - सातारा जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्योगांनी सामाजिक दायित्व निधीचा (CSR) विनियोग करुन कोविड उपचारासाठी दवाखाना उभा करावा, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
लाभार्थी कंपन्यांचे बॅलन्सशिट तपासा
यासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील ‘SEZ’आणि ‘D Zone’चा फायदा घेतलेल्या कंपन्यांची बॅलन्सशिट मागवाव्यात, त्या तपासून कायद्याने अनिवार्य असलेलल्या उद्योगांना सामाजिक दायित्व निधी (CSR) चा निधी हा सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी कोविड उपचारासाठी दवाखाना उभा करण्यासाठी खर्च करावा , अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना केल्या.