कराड (सातारा) - कराडच्या रेल्वे स्थानक मार्गावर असलेले देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी टँगो आणि संत्रा दारूच्या ७०२ बाटल्या मिळून तब्बल २ लाख ६५ हजाराची दारू लंपास केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरा फोडून त्यातील डीव्हीआर मशीन आणि टीव्हीसुध्दा चोरट्यांनी नेला आहे. दुकान मालक सर्जेराव शामराव पाटील (रा. गोवारे, ता. कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कराडमधील देशी दारूचे दुकान फोडले; २ लाख ६५ हजारांची दारू लंपास - liquor crime karad
कराडच्या रेल्वे स्थानक मार्गावर असलेले देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी टँगो आणि संत्रा दारूच्या ७०२ बाटल्या मिळून तब्बल २ लाख ६५ हजाराची दारू लंपास केली आहे.
दुकान मालकाचा पुतण्या हर्षवर्धन याने शनिवारी सकाळी चुलते सर्जेराव पाटील यांना फोन करून दुकानाचे शटर उचकटल्याची माहिती दिली. त्यानंतर ते दुकानाकडे आले आणि कराड शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस आल्यानंतर दुकानात जाऊन पाहिले असता सीसीटीव्ही कॅमेरे फोडून त्यातील डीव्हीआर मशीन तसेच टीव्ही आणि दारूच्या ७०२ बाटल्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. लॉकडाऊनपासून दुकान बंद होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी दुकान फोडून तब्बल २ लाख ६५ हजाराची दारू लंपास केली आहे. याप्रकरणी अज्ञातांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.