सातारा - जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी चांगला पाऊस झाला. कराड तालुक्यात तब्बल 539 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे अनेक शेतात पाणी साचल्याने तळी निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत.
कराड तालुक्यात दोन दिवसात 539 मिलीमीटर पावसाची नोंद - satara rain news
मंगळवारी दुपारी आणि बुधवारी रात्री कराड तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला. शहरातील अनेक अपार्टमेंटच्या गाळ्यात पावसाचे पाणी साचल्याने व्यापार्यांना मोटारी लावून पाणी उपसावे लागले. तसेच ग्रामीण भागात शेतांची तळी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
![कराड तालुक्यात दोन दिवसात 539 मिलीमीटर पावसाची नोंद सातारा पाऊस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12001198-1076-12001198-1622715572785.jpg)
पेरणीपुर्वीची कामे ठप्प -
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. या दोन दिवसात कराड तालुक्यात तब्बल 539 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कराड तालुक्यात गेली आठवडाभर सातत्याने पावसाच्या सरी कोसळत आहे. दुपार झाली की ढगांचा गडगडाट आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात होत आहे. त्यामुळे शेतातील पेरणी पुर्वीची कामे ठप्प झाली आहेत. मंगळवारी दुपारी आणि बुधवारी रात्री कराड तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला. शहरातील अनेक अपार्टमेंटच्या गाळ्यात पावसाचे पाणी साचल्याने व्यापार्यांना मोटारी लावून पाणी उपसावे लागले. तसेच ग्रामीण भागात शेतांची तळी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.