कराड (सातारा)- जगातील सर्वात मोठी सहकारी संस्था असणाऱ्या इफकोने जागतिक समता दिनाचे औचित्य साधून सह्याद्री सहकारी साखर कारखाना स्थळावर सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते शेतकरी व कामगारांना १ हजार सॅनिटायझरच्या बाटल्यांचे वाटप केले. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती सुरू आहे. 'ना नफा, ना तोट' या धर्तीवर कारखाना सॅनिटायझरची विक्री करत असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
'इफको'कडून शेतकरी, कामगारांना सॅनिटायझरचे वाटप - iffco company
इफको संस्था संपूर्ण देशभर कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वाटप करीत आहे. तसेच इफको संस्थेने कोरोना विरुद्धच्या लढाईत योगदान म्हणून पीएम केअर फंडासाठी 25 कोटी रुपये दिले असल्याचे इफको संस्थेचे अधिकारी संदीप रोकडे यांनी सांगितले.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था मदत करत आहेत. इफको सारख्या सहकारी संस्थेनेही शेतकरी, कामगारांना सॅनिटायझरचे वाटप करून 'इफको का है ये नारा, कोरोना को है हराना', हे उद्दीष्ठ साध्य करण्यासाठी इफको संस्था योगदान देत आहे, असे पाटील म्हणाले.