सातारा- दोन दिवसांत एक एप्रिल येत आहे. प्रचलित प्रथेनुसार 1 एप्रिलच्या अनुषंगाने सर्वजण एकमेकांना ‘एप्रिल फूल’ करुन गंमतीने फसवणूक करीत असतात. परंतु, यावेळी कोरोनाचे संकट संपूर्ण जगभर पसरलेले आहे. त्यामुळे 1 एप्रिल या दिवशी कोरोनाच्या अनुषंगाने चुकीचे मॅसेज, अफवा पसरवू शकतात. त्यामुळे असे मॅसेज पाठविल्यास थेट जेलमध्ये जावे लागेल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिला आहे.
हेही वाचा-'या' महामारीनंतरचे आर्थिक संकट उंबरठ्यावर आहे'
COVID-19: सावधान...! यंदा 'एप्रिल फूल’ कराल, तर थेट जेलची हवा - सातारा क्राईम बातमी
1 एप्रिलला देशातील सर्वच नागरिक एप्रिल फूल म्हणून अनेकांना फसवणुकीचे विनोदी मॅसेज आणि मिम्स टाकत असतात. यामुळे अनेकांचे मनोरंजन होत असले तरी या मॅसेजमुळे गंभीर परिस्थितीही उद्भवत असते. देशात कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्या अनुषंगाने 1 एप्रिल म्हणजेच एप्रिल फूल दिवशी अनेक लोक कोरोनाच्या अनुषंगाने विनोद तसेच खोटे मॅसेज प्रसारित करु शकतात.
1 एप्रिलला देशातील सर्वच नागरिक एप्रिल फूल म्हणून अनेकांना फसवणुकीचे विनोदी मॅसेज आणि मिम्स टाकत असतात. यामुळे अनेकांचे मनोरंजन होत असले तरी या मॅसेजमुळे गंभीर परिस्थितीही उद्भवत असते. देशात कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्या अनुषंगाने 1 एप्रिल म्हणजेच एप्रिल फूल दिवशी अनेक लोक कोरोनाच्या अनुषंगाने विनोद तसेच खोटे मॅसेज प्रसारित करु शकतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच एखादा अनुचित प्रसंगही घडण्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील सोशल मीडिया वापरणारे नागरिक तसेच विविध व्हाटस्अॅप ग्रुपचे ऍडमिन यांनी ग्रुपमधील सदस्यांना अशाप्रकारचे मॅसेज प्रसारित करु नयेत. याबाबत कळवावे. अन्यथा एक एप्रिल दिवशी व्हाटसऍप ग्रुपचे सेटिंग बदलून केवळ ऍडमिनच मॅसेज पाठवू शकेल, असे सेटिंग करावे. अन्यथा एप्रिल फूल दिवशी कोरोनाशी संबंधित कोणतेही चुकीचे मॅसेज प्रसारित केले तर व्हाटस्अॅप ऍडमिनसह सदस्यांवरही कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.