सातारा : शहरातून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात (Satara City Police Statin) दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल (Wife files case against husband Satara) केला आहे. पतीने बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून पतीने पत्नीचे गुप्तपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग (husband secretly video recording wife Satara) केले. याप्रकरणी पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. Satara Crime, latest news from Satara, husband recorded his wife secret Video
Wife Bedroom Video Recording : हा पती का हैवान? पत्नीच्या बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून केले गुप्त व्हिडिओ रेकॉर्डिंग
पतीने बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून पतीने पत्नीचे गुप्तपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग (husband secretly video recording wife Satara) केले. याप्रकरणी पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. Satara Crime, latest news from Satara
बोअरवेल गाडी घेण्यासाठी पतीचा तगादा-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला साताऱ्यातील एका रुग्णालयात काम करते. बोअरवेल गाडी घेण्यासाठी पतीने पत्नीकडे पैशासाठी तगादा लावला होता. या कारणावरून तो पत्नीचा छळ करत होता. पतीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत पत्नीने विचारणा केल्यानंतर मुलांना विष पाजून जीव देईन व तुझ्या वडिलांना खडी फोडायला पाठवीन, अशी धमकी पती द्यायचा. तसेच पत्नी कामाला असलेल्या रुग्णालयात जाऊन दंगा करण्याचीही धमकी देत असे.
बेडरूममध्ये लावला छुपा कॅमेरा -एके दिवशी बेडरुममध्ये पतीने छुपा कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. हा प्रकार पत्नीच्या निदर्शनास आल्यानंतर तिला धक्का बसला. पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती विरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पीडितेच्या पतीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन महिला पोलिसांकडे तपास देण्यात आला आहे.