सातारा -विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता जागा वाटपाच्या जवळपास पोहचली आहे. या वेळी अमोल कोल्हे आणि बाकी तरुण सहकाऱ्यांना निवडणूक प्रचारात उतरवणार आहोत. त्यानुसार नियोजन केले जात आहे, असे पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले. तीन तलाक विधेयकाला पक्षाने विरोध केला होता. मी त्यावेळी सभागृहात हजर राहू शकलो नाही. महिलांना सुरक्षिततेला आमचा पाठिंबा आहे. मात्र, ३ वर्षांची शिक्षा जास्त होते. या कालावधीत त्याच्या मुला-बाळांकडे बघणार कोण? असा प्रश्न पवारांनी केला.
तीन तलाकला राष्ट्रावादीचा विरोधच, शरद पवारांनी सांगितले राज्यसभेतील गैरहजेरीचे कारण - पत्रकार परिषद
चित्रा वाघ यांचे पती किशोर यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या घाबरल्या होत्या. त्याबाबत वाघ मला भेटल्या आणि बचावासाठी पक्ष सोडून जात असल्याचे मला त्यांनी कळवले.
तीन तलाकला राष्ट्रावादीचा विरोधच, शरद पवारांनी सांगीतले राज्यसभेतील गैरहजेरीचे कारण
चित्रा वाघ भाजप प्रवेश -
चित्रा वाघ यांचे पती किशोर यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या घाबरल्या होत्या. त्याबाबत वाघ मला भेटल्या आणि बचावासाठी पक्ष सोडून जात असल्याचे मला त्यांनी कळवले. यानंतर त्यांनी राजीनामा दिला, असे पवार म्हणाले.