सातारा -आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कराडच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळावर जाऊन अभिवादन केले. तसेच विद्यार्थ्यांनीही त्यांना शब्दसुमनांजली वाहिली.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी मान्यवरांची आदरांजली ; यशवंतप्रेमींची प्रीतिसंगमावर गर्दी - satara news
सातारचे खा. श्रीनिवास पाटील, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी गुरूवारी सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
सातारचे खा. श्रीनिवास पाटील, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी गुरूवारी सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलिमा येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, मानसिंगराव जगदाळे, सुनील काटकर, कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेवक राजेंद्र यादव, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, नगरसेविका विद्या पावसकर, अंजली कुंभार, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, माजी सभापती फरिदा इनामदार, माजी उपसभापती सुहास बोराटे, शालन माळी, युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे, जि. प. सदस्य निवासराव थोरात, भाजपाचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, इंद्रजित चव्हाण, किसनराव पाटील-घोणशीकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माने, यांच्यास विविध क्षेत्रातील मान्यवर आणि यशवंतप्रेमींनी स्व. चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रीतिसंगम परिसरात गुरूवारी सकाळी आदरांजली वाहिली.