महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कडकनाथ पोल्ट्री व्यावसायिकांना न्याय देण्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन - गृहमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो इंडीया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या राज्यातील जिल्ह्यांसह कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांची कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.

satara
कडकनाथ पोल्ट्री व्यावसायिकांना न्याय देण्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

By

Published : Dec 18, 2019, 9:43 AM IST

सातारा - महाराष्ट्रसह इतर राज्यात कडकनाथ पोल्ट्री व्यावसायिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी फसवणूक झालेल्या व्यावसायिकांनी मोटार रॅली काढून थेट मुंबई विधानसभेवर धडक मारली. याप्रकरणी व्यावसायिकांनी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. गृहमंत्री शिंदे यांनी फसवणूक झालेल्या कडकनाथ पोल्ट्री व्यावसायिकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा -नुकसानग्रस्तांना 3 कोटी 77 लाखांची मदत मंजूर; पाटण तहसीलदारांकडे रक्कम वर्ग

इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो इंडीया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या राज्यातील जिल्ह्यांसह कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांची कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत सांगली आणि सातारा जिल्ह्यात संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, संबंधितांवर गुन्हे दाखल होवून चार महिने झाले तरी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.

हेही वाचा -साताऱ्यामध्ये विजय दिवस साजरा; कराडकरांनी अनुभवला हवाई कसरतींचा थरार

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील फसवणूक झालेले पोल्ट्री व्यावासयिक सातारा येथून मोटार सायकल रॅलीने आझाद मैदान मुंबई येथे दाखल झाले. त्याठिकाणी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर आझाद मैदान ते मंत्रालय, विधानसभा असा भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा विधानभवनावर गेल्यानंतर तेथे सर्व पोल्ट्री व्यावसायिकांनी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आपली कैफियत मांडून मागण्यांचे निवेदन दिले. पोल्ट्री व्यावसायिक आणि गृहमंत्री शिंदे यांच्यात चर्चा झाल्यानंतर फसवणूक करणाऱ्या संबंधित कंपनीची चौकशी सुरू असून व्यावसायिकांना न्याय मिळवून देवू, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

हेही वाचा -सातारा जिल्ह्यातील 2 गुन्हेगारी टोळ्या विविध तालुक्यातून हद्दपार

यावेळी कॉ. दिग्विजय पाटील, जोतिबा पाटील, सुनिल जाधव, दत्तात्रय घाडी, नंदकुमार मिरजकर, निलेश मोरे सुधीर पाटील, विजय मांडके, सचिन काशिनाथ शिर्के, योगेश रमेश कदम, बबन बाबुराव साळुंखे, फारूख मोकाशी, आसिफ मोकाशी, मोसीन कासारकर, नीळकंठ पवार, विष्णू मोरे, योगेश घाडगे, बबन साळुंखे, मोसीन सातारकर यांच्यासह कडकनाथमध्ये फसवणूक झालेले सर्व व्यावसायिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details