सातारा - महाराष्ट्राला दोन दोन गृहराज्यमंत्री असताना राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सातारा जिल्ह्यातच बलात्काराच्या पाच घटना समोर आल्या. त्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चकार शब्द काढला नाही. आता महाबळेश्वरच्या अत्याचार प्रकरणात ते म्हणतात आरोपींना सोडणार नाही, पण किमान त्यांना आधी पकडा तरी साहेब, अशा शब्दांत भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री देसाई यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा -कराडच्या वाखान परिसरात महिलेचा निर्घृण खून, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही तपासणार
बावळेकर यांना सहआरोपी करा
महाबळेश्वर येथे पीडित मुलीची वाघ यांनी आज भेट घेऊन कुटुंबीयांना धीर दिला. तसेच, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची महाबळेश्वरमध्ये भेट घेतली. चित्रा वाघ यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बावळेकर यांना सहआरोपी करण्याची जोरदार मागणी केली.
महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष हे कुठल्या पक्षाचे आहेत हे न पहाता त्यांनाही सहआरोपी पोलिसांनी का केलेले नाही. दत्तात्रय बावळेकर यांच्यासमोर दत्तक विधान होत असेल तर, सहआरोपी करण्यात यावे. त्यांच्या मुलाची वकिलीची सनद रद्द करण्यात यावी, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली.