सातारा - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांच्या खासगी सचिवाच्या गाडीतून रोकड असलेली बॅग चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साताऱ्यातील फलटण तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. फलटण पोलिसांनी तातडीने तपासाला सुरूवात केली आहे.
गृहमंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या गाडीतून रोकड असलेली बॅग लंपास - दिलीप वळसे पाटील खासगी सचिव
बाबासाहेब शिंदे हे शुक्रवारी (दि. १०) धुळदेव (ता. फलटण) येथे विवाह सोहळ्यासाठी आले होते. विवाह सोहळा उरकून परत जात असताना त्यांना गाडीची काच फोडल्याचे, तसेच एक बॅग आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. बॅगेत काही महत्वाची कागदपत्रेही होती.
![गृहमंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या गाडीतून रोकड असलेली बॅग लंपास प्रतिकात्मक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13881823-thumbnail-3x2-op.jpg)
प्रतिकात्मक
गाडीची काच फोडून चोरी
गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे हे शुक्रवारी ( दि. १० ) धुळदेव ( ता. फलटण ) येथे विवाह सोहळ्यासाठी आले होते. विवाह सोहळा उरकून परत जात असताना त्यांना गाडीची काच फोडल्याचे, तसेच एक बॅग आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. बॅगेत काही महत्वाची कागदपत्रेही होती. बाबासाहेब शिंदे यांनी फलटण शहर पोलीस ठाणे गाठले आणि चोरीची तक्रार नोंदवली. या घटनेमुळे सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.