कराड (सातारा)-वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील चिखलीमधील रमेश गिऱ्हे यांनी शनिवारी गृहराज्यमंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. आपली तेरा वर्षांची मुलगी आजारी असून रुग्णालयात जायला वाहन मिळत नसल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. देसाईंनी वाशिमचे जिल्हाधिकारी, रिसोडच्या तहसिलदारांशी संपर्क करुन रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यामुळे मुलीवर वेळेत उपचार शक्य झाले.
वाशिममधून पाटणला फोन... मुलीवर वेळेत उपचार - रुग्णवाहिका बातमी
वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. आपली तेरा वर्षांची मुलगी आजारी असून रुग्णालयात जायला वाहन मिळत नसल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. देसाईंनी वाशिमचे जिल्हाधिकारी, रिसोडच्या तहसिलदारांशी संपर्क करुन रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.
हेही वाचा-ओडिशामध्ये 'ओला' करणार अत्यावश्यक वाहतूक; रुग्णांसह डॉक्टर अन् वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही फायदा..
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री म्हणून त्यांनी वाशिममाठी 1 कोटीच्या निधीची तरतूद केली आहे. त्याचे वाशिम जिल्ह्यात कौतुक झाले. सध्या ते सातारा जिल्ह्यात असले तरी दिवसातून दोनदा वाशिमच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून कोरोना संदर्भातील उपाययोजनांची माहिती घेतात. वाशिम जिल्ह्यातील लोक थेट पालकमंत्र्यांशी संपर्क साधून आपल्या समस्या सांगत आहेत. त्यांची तातडीने दखलही घेतली जात आहे.