महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 4, 2019, 9:26 PM IST

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यातील माण तालुका वगळता, सोमवारी सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने माण तालुका वगळता सर्व तालुक्यातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

सातारा - जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राने आणखी २ दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील माण तालुका वगळून सर्व तालुक्‍यांमधील शाळांना सोमवारी (५ ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी रविवारी सायंकाळी हा निर्णय घेतला असून अतिवृष्टीचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. प्रादेशिक हवामान अंदाज केंद्र, मुंबई यांनी ४ ते ६ ऑगस्ट कालावधीत महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीवर वारे ताशी ४० ते ६० कि.मी.वेगाने वाहणार आहे. यामुळे अतिवृष्टी होण्याची शक्‍यता वर्तवली आहे.

सध्या जिल्ह्यातील महाबळेश्‍वर, पाटण, जावली, वाई, सातारा व कराड तालुक्‍यात अतिवृष्टीस होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने माण तालुका वगळता सर्व तालुक्यातील शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये आणखी अतिवृष्टीची शक्‍यता गृहीत धरुन अनुचित प्रकार टाळण्यासाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details