महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यातील हुतात्म्यांचे गाव असलेल्या 'वडूज'चा इतिहास - मोर्चा

खटाव तालुक्यातील ब्रिटिश सरकारविरोधात जनक्रांती घडवत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले. पोस्टर जाळणे, भूमिगत चळवळ, सरकारी तिजोरीवरती दरोडा टाकून ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले होते.

सातारा

By

Published : Aug 14, 2019, 12:33 PM IST

सातारा- जिल्ह्यातील खटाव हा पाण्याचे दुर्भिक्ष्य असणारा तालुका म्हणून सर्वपरिचित आहे .मात्र, या तालुक्यातील वडूज हे हुतात्म्यांची भूमी असलेले गाव आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली 1942 च्या चळवळीने संपुर्ण देश खडबडून जागा झाला होता. महात्मा गांधींनी इंग्रजांना भारत छोडो आदेश दिला आणि सर्वच कार्यकर्ते मोर्चे बांधू लागले.

सातारा जिल्ह्यातील हुतात्म्यांचे गाव असलेल्या 'वडूज'चा इतिहास

त्यानुसार गुप्त बैठक 9 सप्टेंबर 1942 ला वडूज येथे झाली. मामलेदार कचेरीला मोर्चा यशस्वी करण्याचे ठरवले. 9 सप्टेंबर 1942 ला सुमारे दीड हजार लोक सामील झालेला हा विराट मोर्चा जयराम स्वामी वडगाव येथून ६ वाजता चालत निघाला आणि १३ मैल अंतर कापत, "वंदे मातरम भारत माता की जय" अशा उस्फुर्त घोषणा देत. दुपारी १२ वाजता कचेरीजवळ पोहोचला. मामलेदार अंकली व फौजदार बिंडीगिरी यांनी मोर्चा कचेरीपासून १५० फुटावर असलेल्या गोविंद राव महादेव शिंदे यांच्या हॉटेलजवळ अडवला. अडवून ठेवलेल्या मोर्चाने भर उन्हात तेथेच बैठक मांडली.

मोर्चोकऱ्यांच्या 'युनियनजॕक उतरवून तिरंगा फडकवा' या मागणीने चिडलेल्या निर्दयी ब्रिटिशांनी सर्व संकेत धाब्यावर बसून मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या परशुराम घार्गे आणि इतर मोर्चेकऱ्यांवर बेछूट गोळीबार चालू केला. या प्रकरणामुळे भेदरलेल्या निशस्त्र मोर्चेकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली. जवळ कोणतेही हत्यार नाही. गोळ्यांचा बेछूट वर्षावाने जागच्या जागीच पाच जणांनी हुतात्मा पत्कारले. चार जण गंभीर जखमी झाल्याने वाटेतच त्यांना हुतात्मा आले. यात शेकडो जण कायमचे जायबंदी झाले.

हौतात्मय स्वीकरणाऱ्या स्वातंत्र्यसेनांनीमध्ये परशुराम श्रीपती घार्गे, किसन बाळा भोसले, किसन मारुती शिंदे, सिदु पवार, राम कृष्ण सुतार, बलभीम खटावकर, बाळकृष्ण खटावकर, श्रीरंग शिंदे, आनंद गायकवाड या 9 जणांचा समावेश होता. वडगावचे पोलीस पाटील खाशाबा घार्गे यांनाही पोलिसांनी हातपाय बांधून रक्त ओकेपर्यंत बेदम मारले.

याच खटाव तालुक्यातील ब्रिटिश सरकारविरोधात जनक्रांती घडवत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले. पोस्टर जाळणे, भूमिगत चळवळ, सरकारी तिजोरीवरती दरोडा टाकून ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details