सातारा - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर आज संपली. आज सकाळी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे वक्तव्य गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल - गृहराज्यमंत्री - Hinganghat news
हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर आज संपली. आज सकाळी सकाळी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल असे वक्तव्य गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले.
ही घटना अत्यंत खेदजनक आहे. या प्रकरणाबाबत मी पोलीस प्रशासनाला सक्त सूचना दिल्या होत्या. आरोपीला अटक करण्यात आली असून, उपविभागीय अधिकारी दर्जाच्या अधिकारी वर्गाकडे हा तपास दिला असल्याचे देसाई म्हणाले. मी राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे. गृहमंत्रालय तसेच पोलीस प्रशासनाने यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी ठेवणार नाही. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल. कसल्याही परिस्थिती हा आरोपी सुटणार नाही. माझ्या गृहविभागामार्फत सर्व बाबी कोर्टासमोर आणल्या जातील, असेही देसाई म्हणाले.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज आठव्या दिवशी सोमवारीच तिची मृत्यूशी झुंज संपली.
TAGGED:
Hinganghat news