सातारा- कृष्णा नदीवरील जुना पूल कोसळल्याने नवीन पुलावरील वाहतुकीत वाढ झाली आहे. त्यात पुलावर आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली. आज (बुधवार) अधिकार्यांनी तातडीने रस्त्यासह वाहतूक कोंडीची पाहणी केली आणि येत्या ८ दिवसात रस्त्यांच्या दुरुस्तीसह इतर समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.
कराड-विटा मार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुना पूल कोसळल्याने नवीन पुलावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यातच पुलावर आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली आणि रस्त्याची पाहणी केली.
रस्ताच्या अवस्था पाहून अधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उप-कार्यकारी अभियंता रमेश पन्हाळकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, शहराध्यक्ष सागर बर्गे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.