कराड (सातारा) -ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात गुरूवारी पहाटे कराड तालुक्यात गारपीटीसह वादळी पाऊस झाला. अवघ्या दोन तासात 126 मी. मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून वादळी पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले.
दोन तास वादळी पाऊस

गुरूवारी पहाटे चारच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटात वादळी पावसाला सुरूवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. सुमारे दोन तास वादळी पावसाने कराड तालुक्याला झोडपले. 9.69 मी. मी. इतक्या सरासरीने कराड तालुक्यातील 9 मंडलांमध्ये अवघ्या दोन तासात 126 मी. मी. इतक्या पावसाची नोंद झाली.
मंडलनिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी