सातारा - मागील तीन दिवसांपासून पावसाने माण, खटाव, फलटण कोरेगाव तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे नद्या, ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. तसेच बंधारे भरुन गेले आहे. रात्री झालेल्या पावसामुळे खटाव तालुक्यातील नेर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
दुष्काळी साताऱ्यात जोरदार पाऊस; नेर धरण भरले, शेतकऱ्यांना दिलासा - सातारा पाऊस
पावसाने माण, खटाव, फलटण कोरेगाव तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे नद्या, ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. तसेच बंधारे भरुन गेले आहे. रात्री झालेल्या पावसामुळे खटाव तालुक्यातील नेर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
नेर धरण भरले
कुळकजाई येथून उगम पावणाऱ्या माणगंगा आणि बाणगंगा या दोन्ही नद्यांना पाणी आले आहे. बाणगंगा नदीमुळे दहिवडी फलटण शहराचा संपर्क तुटला आहे. सोमवारी रात्री बहुतांशी ठिकाणी 70 मी.मी. ते 80 मी.मी. पाऊस झाला आहे. ओढ्यांवरील सिमेंट बंधारे भरुन वाहिले. ठिकठिकाणी ओढ्यांना पूर आले आहेत. दुष्काळी भागातील बळीराजाचे चेहरे खुलले आहे. अजून काही दिवस अशाच पावसाची अपेक्षा शेतकरी व जनता करत आहे.