महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुन्हा जोरदार आगमन - rain

सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव आणि महाबळेश्वरला पाणी पुरवठा करणारे लेक तलाव भरून वाहत आहेत. कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 105.05 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे कोयना धरण आजच्या घडीला 50 टक्क्याहून अधिक भरले आहे.

कोयना धरण

By

Published : Jul 27, 2019, 12:07 PM IST

सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस गेल्या चार दिवसांपासून जोरदारपणे बरसत आहे. त्यामुळे कोयना धरणात 9283 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून धरणात सध्या 56.91 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. तर पाणीपातळी 2111.08 फुटांवर आहे.

सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव आणि महाबळेश्वरला पाणी पुरवठा करणारे वेण्णा लेक तलाव भरून वाहत आहेत. कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 105.05 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे कोयना धरण आजच्या घडीला 50 टक्क्याहून अधिक भरले आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुन्हा जोरदार आगमन

गेल्या काही दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. तुरळक पावसाने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली, तर शुक्रवारी संपूर्ण पाटण तालुक्यातील सर्व भागांसह धरण परिसरात पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. कोयनानगर येथे 2358, नवजा 2733, महाबळेश्वर 2336 एकूण मिलीमीटर पावसाची नोंद आजपर्यंत करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details