महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात मुसळधार पाऊस, माण नदीत एक जण बुडाला

तीन दिवस झालेल्या या मुसळधार पावसाने माण येथील नदीचे पात्र दुथडी भरुन वाहत आहे. गुरूवारी दुपारच्या सुमारास गणेश दहिवडे हे दहिवडे मळ्यातील राहत्या घरी ‌नदीच्या रस्त्याने जात असताना त्यांचा तोल गेला. यानंतर ते नदीच्या प्रवाहात वाहत‌ जाऊन बंधाऱयात बुडाले. यावेळी बंधाऱया‌ नजिकच्या यात्रा मैदानातून ये-जा करण्याऱया नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास येताच‌ नागरिकांनी बंधाऱयातील पाण्यात त्यांचा शोध घेण्याची‌ मोहिम सुरु‌ केली.

साताऱ्यात मुसळधार पाऊस

By

Published : Sep 27, 2019, 1:37 PM IST

सातारा - गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने माण येथील येथील नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. यातच म्हसवड येथील रिंगावण पेठ मैदाना नजिकच्या माण नदीच्या बंधाऱ्यात एक जणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. गणेश ‌आप्पा दहिवडे‌‌ ( ‌वय ४७, रा. दहिवडे, मळा म्हसवड) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच येथील नागरिकांनी बंधाऱ्यातील पाण्यात शोधमोहीम सुरू केली. मात्र, सायंकाळी उशीरापर्यंत काहीच‌ तपास लागू शकला नाही.

साताऱ्यात मुसळधार पाऊस, माण नदीत एक जण बुडाल्याची घटना

हेही वाचा -कांद्याचे भाव नोव्हेंबरपासून उतरतील - नीती आयोग

तीन दिवस झालेल्या या मुसळधार पावसाने माण येथील नदीचे पात्र दुथडी भरुन वाहत आहे. गुरूवारी दुपारच्या सुमारास गणेश दहिवडे हे दहिवडे मळ्यातील राहत्या घरी ‌नदीजवळच्या रस्त्याने जात असताना त्यांचा तोल गेला. यानंतर ते नदीच्या प्रवाहात वाहत‌ जाऊन बंधाऱयात बुडाले. यावेळी बंधाऱया‌ नजिकच्या यात्रा मैदानातून ये-जा करण्याऱया नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास येताच‌ नागरिकांनी बंधाऱयातील पाण्यात त्यांचा शोध घेण्याची‌ मोहीम सुरू केली.

हेही वाचा -प्लास्टिक प्रदूषणामुळे महासागर तुंबतायत; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता..

घटनास्थळी म्हसवड पोलीस ठाणे, पालिका व महसूल कर्मचारी तातडीने दाखल झाले. सपोनि गणेश वाघमोडे, नगराध्यक्ष भगतसिंग‌ विरकर, आदी घटनास्थळी थांबून होते. तर पालिकेने जनरेटरद्वारे प्रकाशाची सुविधा करुन रात्री उशीरापर्यंत शोध मोहीम सुरू ठेवली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details