महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्याला पावसाने झोडपले; मांडवेतील वृद्धेचा ओढ्यात बुडून मृत्यू - बोरगाव पोलीस स्टेशन

दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सातारा तालुक्यातील मांडवे गावाजवळ ओढ्याला पूर आला. यामध्ये ७१ वर्षांची वृद्ध महिला वाहून जाऊन बेपत्ता झाली. ही महिला गुरे चारण्यासाठी शेतात गेली होती.

पावसाने झोडपले
पावसाने झोडपले

By

Published : Jun 5, 2021, 8:50 PM IST

सातारा - शहरासह जिल्ह्याच्या काही भागाला आज (शनिवारी) दुपारपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सातारा तालुक्यातील मांडवे गावामध्ये ओढ्याला आलेल्या पुरात एका वृद्धेचा वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या ४ दिवसांपासून सायंकाळच्या वेळेला सातारा शहरासह जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

मांडवेतील वृद्धेचा ओढ्यात बुडून मृत्यू

100 मीटर अंतरावर आढळला मृतदेह

पुतळाबाई सुधाकर माने (वय ७१, रा. मांडवे) असे बुडून मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. गावाजवळच्या ओढ्यात घटनास्थळापासून सुमारे १०० मीटर अंतरावर झाडात अडकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळाला. गेल्या ४ दिवसांपासून सायंकाळच्या वेळेला सातारा शहरासह जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सातारा तालुक्यातील मांडवे गावाजवळ ओढ्याला पूर आला. यामध्ये ७१ वर्षांची वृद्ध महिला वाहून जाऊन बेपत्ता झाली. ही महिला गुरे चारण्यासाठी शेतात गेली होती. पावसाची चिन्हे दिसू लागल्यामुळे तेथून परत येत असताना वाटेतच पावसाने गाठले आणि ओढ्यात वाहून जाऊन ती बेपत्ता झाली. बोरगाव पोलिस व शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यु टीमच्या मदतीने भर पावसात शोधकार्य करण्यात आले. बोरगाव पोलीस घटनेचा तपास करत आहे. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यु टीमचे तुषार पवार, सुजित पवार, संतोष वायदंडे, अमोल फणसे, केतन फणसे, अंकुश पवार यांनी परिश्रम घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details