महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाबळेश्वरला अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा, स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान - पाऊस

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पाऊस

By

Published : Apr 16, 2019, 10:42 AM IST

सातारा- महाबळेश्वर परिसरात सलग दुसऱ्यांदा वादळी वाऱयासह गारांच्या पावसाने हजेरी लावली. याबरोबरच माण खटावच्या दुष्काळी भागात देखील चांगला पाऊस झाला आहे. महाबळेश्वर भागात सलग तीन दिवस पडलेल्या पावसाने व गारांनी अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरी पिकाचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

महाबळेश्वरला अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा

जिल्ह्यातील कोरेगाव, फलटण, माण खटाव या दुष्काळी भागात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने हवेत थोडासा गारवा निर्माण झाला होता. अनेक भागात पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details