सातारा कराड नगरपालिकेने नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा ( Satara Karad Municipality Eco Friendly Ganeshotsav ) करण्याचे केवळ आवाहन करून न थांबता 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत ( Mazi Vasundhara Campaign ) आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कागदाच्या लगद्यापासून आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ( Health Workers Made Eco Friendly Ganesha Idol) बनवली ( Karad Municipality Celebrated Eco Friendly Ganesh ) आहे.
गणेशोत्सवासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी घेतली मेहनतआरोग्य कर्मचाऱ्यांनी दहा किलो रद्दी कागदाचा लगदा केला. त्या लगद्यापासून आकर्षक मूर्ती बनवली आहे. छाप न वापरता पूर्णपणे हाताने मूर्ती बनवण्यात आली असून, जलरंगाचा वापर करण्यात आला आहे. नगरपालिका सेवक गणेश मंडळाने या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची नगरपालिकेत प्रतिष्ठापना केली आहे. ही गणेशमूर्ती कराडकरांचे आकर्षण ठरली असून, ती हुबेहूब आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळमधील गणेशमूर्तीसारखी आहे.
गणेशोत्सवासाठी 11 एसटी आगारातून ११५ बसेसची सोयगणेशोत्सवात सातारा एसटी विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, वडूज, दहिवडी, मेढा या ११ आगारांमधून ११५ बसेसची सोय करण्यात आली Facility of buses from in Satara agar आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होणार आहे.