महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शाळेतच विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार ; मुख्याध्यापकाला अटक - Student raped at school

मुख्याध्यापकाने शाळेतच विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याच प्रकार समरो आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केली आहे.

headmaster has allegedly sexually assaulted a student at the school
शाळेतच विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार ; मुख्याध्यापकाला अटक

By

Published : Mar 9, 2021, 4:34 PM IST

सातारा - महिला दिनीच एका मुख्याध्यापकाने दहावीतील अल्पवयीन विदयार्थीनीवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. मुख्याध्यापकावर महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप रामचंद्र ढेबे (वय ५०, रा मेटगुताड, ता. महाबळेश्वर) असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

चाईल्ड हेल्पलाईनची मदत -

सर्वत्र महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना महाबळेश्वर येथे एका हायस्कुलच्या मुख्याध्यापकाने केलेल्या कुकर्मामुळे हादरुन गेले आहे. दिलीप रामचंद्र ढेबे हा एका हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक आहे. याच शाळेत इयत्ता दहावीत शिकत असलेल्या जवळच्या नात्यातील पंधरा वर्षीय मुलीवर शाळेच्या प्रयोग शाळेत व हॉलमध्ये वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. या बाबत एका जागरूक नागरीकाने चाईल्ड हेल्पलाईन १०९८ क्रमाकांवर तक्रार दाखल केली होती.

मुलीने वाचला अत्याचाराचा पाढा -

महाराष्ट्र पोलिसांच्या या हेल्पलाईन वरून आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली. त्यांनी हे प्रकरण चैकशीसाठी महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडे वर्ग केले. मागील पाच दिवसांपासुन महाबळेश्वर पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. आरोपी व पिडीत विदयार्थीनीचा पत्ता महाबळेश्वर पोलिसांनी शोधुन काढला. पिडीत मुलीला महाबळेश्वर पोलिसांनी विश्वासात घेतले. त्यानंतर मुलीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.

मुख्याध्यापकावर पोस्को अंतर्गत गुन्हा -

मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून महाबळेश्वर पोलिसांनी मुख्याध्यापकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याप्रकाराबाबत त्याने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे. महाबळेश्वर पोलिस निरिक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या बलात्कार प्रकरणाचा तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details