सातारा - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या हत्येतील पिस्तूल सापडल्याची माहिती माध्यमांकडून मिळत आहे. तपास यंत्रणांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचे, हमीद दाभोलकर यांनी सांगितले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली पिस्तूल ठाण्याजवळच्या समुद्री खाडीत सापडल्याचे समोर आले आहे. पिस्तूल सापडले असेल तर, गुन्हेगारांनाही लवकरात लवकर शोधावे. यामुळे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे मारेकरी समोर येतील, असेही हमीद दाभोलकर म्हणाले.