सातारा - कन्नडमधील ‘लंकेश पत्रिका’ साप्ताहिकाच्या संपादिका, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत ऋषिकेश देवडीकर याला पोलिसांनी अटक केली आहे. या संशयित देवडीकर याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात असलेला सहभाग तपासावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. हमीद दाभोलकर यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा... गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी ऋषीकेश देवडीकरला झारखंडमधून अटक
गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात संशयित ऋषिकेश देवडीकर (रा. औरंगाबाद) याला पोलिसांनी झारखंडमध्ये अटक केली. तो महाराष्ट्रातला असल्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या खुनाच्या गुन्ह्यात त्याच्या सहभागाबद्दल कसून तपास व्हावा, अशी अपेक्षा डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या गुन्ह्याचा अद्याप तपास पूर्ण झालेला नाही. डॉ. दाभोलकर यांच्यानंतर गोविंदराव पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश या सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्या एकापाठोपाठ एक घडत गेल्या होत्या.