महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gunratna Sadavarte : सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले, सदावर्तेंनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा - गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात साताऱ्यात गुन्हा

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने वकील गुणरत्न सदावर्ते ( Maratha Reservation Gunratna Sadavarte ) यांनी कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती ( MP Sambhajiraje Chhatrapati ) व सातारचे खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanraje Bhosale ) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून साताऱ्यात सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल ( FIR Against Gunratna Sadavarte ) आहे. याप्रकरणी सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले ( Gunratna Sadavarte Arrested By Satara Police ) असून, शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सातारा पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर गुणरत्न सदावर्तेंनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा
सातारा पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर गुणरत्न सदावर्तेंनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

By

Published : Apr 14, 2022, 6:07 PM IST

सातारा : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना घेऊन येणारे पोलिस पथक साताऱ्यात दाखल झाले. त्यांना शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी त्यांनी 'भारत माता कि जय' अशा घोषणा ( Gunaratna Sadavarte chanted Bharat Mataki Jai ) दिल्या. मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation Gunratna Sadavarte ) अनुषंगाने अ‍ॅड. सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती ( MP Sambhajiraje Chhatrapati ) व सातारचे खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanraje Bhosale ) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सातारा पोलिसांत आॉक्टोबर २०२० मध्ये गुन्हा दाखल ( FIR Against Gunratna Sadavarte ) आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सातारा पोलिसांनी अ‍ॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेतले ( Gunratna Sadavarte Arrested By Satara Police ) आहे. प्रथम त्यांना शहर पोलिस ठाण्यात हजर केले जाईल. नंतर न्यायालयापुढे उभे केले जाण्याची शक्यता आहे. शहर पोलिस ठाणे परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

२०२० मधील दाखल गुन्हा : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने अ‍ॅड. सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती व सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सातारा पोलिसांत आॉक्टोबर २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात सातारा पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतले आहे.

सातारा पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर गुणरत्न सदावर्तेंनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

हेही वाचा : ऑर्थर तुरुंगानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा साताऱ्यातील तुरुंगात मुक्काम? न्यायालयात आज करणार हजर

ABOUT THE AUTHOR

...view details