सातारा - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ( Gunaratna Sadavarte Appears In Satara Court ) सातारा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य केल्याप्रकरणी १४ एप्रिल रोजी त्यांना सातारा पोलिसांनी मुंबई कारागृहातून ताब्यात ( Satara Police Taken Gunaratna Sadavarte Custody ) घेतले होते. आज त्यांची ४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली.न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
वंदे मातरम् सह घोषणा - गेल्या शुक्रवारी त्यांना सातारा येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकूण अॅड. सदावर्ते यांची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली होती. मुदत संपल्याने आज सायंकाळी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आज सकाळी पाेलिस सदावर्तेंना कोठडीतून शहर पोलीस ठाण्याकडे नेत असताना त्यांनी 'वंदे मातरम्, भारत माता की जय, जुल्म कधी जिंकत नसतो" अशा घाेषणा दिल्या होत्या.