महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोयाबीनला ३ हजार ८८० रुपयांचा हमी भाव; १५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरू - soybean rate satara

राज्यात अजूनही पाऊस पडत आहे. त्यामुळे, सोयाबीनला ओलसरपणा येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये. सोयाबीनला राज्य शासनाने ३ हजार ८८० रुपये भाव दिला आहे. राज्य शासनाकडून १५ ऑक्टोंबर पासून सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करून शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील
राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील

By

Published : Oct 5, 2020, 10:10 PM IST

सातारा- यावर्षी शासन संपूर्ण राज्यात सोयाबीनसाठी ३ हजार ८८० रुपये हमी भाव देणार आहे. येत्या १५ ऑक्टोबर पासून राज्यात खरेदी केंद्रे सुरू होतील, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील

राज्यातील सोयाबीनचे पीक काढणे व मळणीचे काम अंतिम टप्यात आहे. काही शेतकरी आपला माल लवकरात लवकर विकावा यासाठी खासगी व्यापाऱ्यांकडे जात आहेत. तरी शेतकऱ्यांनी राज्य शासनाने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावरच आपला माल विकावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

राज्यात अजूनही पाऊस पडत आहे. त्यामुळे, सोयाबीनला ओलसरपणा येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये. सोयाबीनला राज्य शासनाने ३ हजार ८८० रुपये भाव दिला आहे. राज्य शासनाकडून १५ ऑक्टोंबर पासून सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करूनच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.

हेही वाचा-कृषी विधेयकावरून काँग्रेस व मित्रपक्ष करतायेत दिशाभूल : रावसाहेब दानवे

ABOUT THE AUTHOR

...view details