महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara Crime : सातार्‍यात पिस्तुल विक्री करणाऱ्या चौघांना अटक, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त - सातार्‍यात चौघांना अटक

पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या चौघांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक (Four arrested for selling pistols in Satara) केली आहे. त्यांच्याकडून 4 पिस्तुल, 8 काडतुसे मॅगझीन, मोटरसायकली आणि मोबाईल, असा एकूण 4 लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त (Goods worth Rs 4 lakh seized) करण्यात आला आहे. दरम्यान, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात सातारा पोलिसांनी 19 संशयितांना पकडून त्यांच्याकडून देशी बनावटीची 12 पिस्तुल आणि 12 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. (Satara Crime)

Satara Crime
अटक केलेले आरोपी

By

Published : Dec 31, 2022, 5:37 PM IST

जप्त केलेल्या मुद्देमालासह अटक केलेले आरोपी

सातारा : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताची धामधूम सुरू असतानाच सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पिस्टल विक्री करण्यासाठी (Four arrested for selling pistols in Satara) आलेल्या चौघांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून 4 पिस्तुल, 8 काडतुसे मॅगझीन, मोटरसायकली आणि मोबाईल, असा एकूण 4 लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त (Goods worth Rs 4 lakh seized) करण्यात आला आहे. गणराज गायकवाड (दौड, जि. पुणे), आदित्य गायकवाड (कोरेगाव, जि. सातारा), वैभव वाघमोडे (तासगाव, जि. सांगली), स्वप्नील मदने (पलूस, जि. सांगली), अशी संशयितांची नावे आहेत. (Satara Crime)

सातारा पोलिसांची कारवाई : सातार्‍यातील शिवराज पेट्रोल पंप चौकात दोघेजण पिस्तुल विक्रीसाठी यामाहा मोटरसायकलवरून येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या पथकाने सापळा लावला. यावेळी यामाहा मोटरसायकलवरून (क्र. एम. एच. 42 ए. व्ही. 1915) आलेल्या दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तुल आणि 6 काडतुसे, एक मोबाईल सापडला.ताब्यात घेतलेल्या संशयितांनी आणखी दोघेजण वाढे फाटा येथे थांबल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि 2 काडतुसे, मोबाईल आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केली.

दोन महिन्यात मोठी कारवाई : सातारा स्थानिक गुन्हे शाखा तसेच सातारा शहर, शाहुपुरी पोलिसांनी मागील नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवैधरित्या पिस्तुल बाळगणार्‍या तसेच विक्रीसाठी पिस्तुल घेऊन आलेल्या 19 संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयितांकडून 12 पिस्तुल आणि 12 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. समीर शेख यांनी पोलीस अधीक्षकपदाचा पदभार घेतल्यापासून पोलीस प्रशासन गतिमान झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा पिस्टल बाळगणार्‍यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details