सातारा - कोथरूड येथील मुलीचे फलटणमधील एका मुलाशी प्रेमप्रकरण होते. मात्र, मुलाने धोका देत दुसऱ्या मुलीशी लग्न केले. ही बातमी समजताच ती मुलगी काही पत्ता माहीत नसताना त्याच्या शोधात फलटणला रात्री 12 च्या सुमारास आली. यावेळी नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत तिच्या घरच्यांच्या स्वाधीन केले.
गोष्ट एका प्रेमाची.. प्रियकराच्या शोधात पुण्याची तरुणी आली रात्री 12 वाजता फलटणला
फलटण येथील एक मुलगा पुण्यात राहत होता. त्याचे पुण्यातील एका मुलीशी काहीदिवस प्रेमसंबंध होते. मात्र, मुलाने धोका देत दुसऱ्या मुलीशी लग्न केले. त्यानंतर तो फलटण येथे राहण्यास आला. हे समजल्यानंतर ती पुण्यातील मुलगी रात्री घरी कोणालाही न सांगता फलटणला रात्री १२ च्या सुमारास आली.
हेही वाचा-CAA : हिंसा झाल्यास आम्ही सरकारला विरोध करण्यापासून बाजूला होऊ - ओवेसी
फलटण येथील एक मुलगा पुण्यात राहत होता. त्याचे पुण्यातील एका मुलीशी काही दिवस प्रेमसंबंध होते. मात्र, मुलाने धोका देत दुसऱ्या मुलीशी लग्न केले. त्यानंतर तो फलटण येथे राहण्यास आला. हे समजल्यानंतर ती पुण्यातील मुलगी रात्री घरी कोणालाही काही न सांगता फलटणला रात्री १२ च्या सुमारास आली. मात्र, तिला त्या मुलाचा पत्ता वगैरे काहीच माहीत नव्हते. त्यामुळे ती तरुण मुलगी असुरक्षितरित्या स्थानकावर थांबली होती. ती प्रवाशांना माहिती विचारात होती. नागरिकांना शंका आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यांतर पोलिसांनी फलटण बसस्थानकात जावून मुलीला ताब्यात घेतले. तिच्या घरच्यांशी संपर्क साधून तिच्या वडिलांना पुण्यावरून बोलावून मुलीला त्यांच्या ताब्यात दिले.